Premier League: मॅन्चेस्टर सिटीची विजयी घौडदौड कायम

प्रीमियर लीगमध्ये घातली नव्या विक्रमाला गवसणी

काल प्रिमियर लीगमध्ये मॅन्चेस्टर सिटीने वेस्ट हॅमला २-१ ने हरवत आपला दबदबा कायम राखला. सिटी तर्फे ओटामेंडी आणि डेविड सिल्वाने ५७ आणि ८३ व्या मिनिटला गोल नोंदवले तर वेस्ट हॅम तर्फे ओगबोन्नाने ४४ व्या मिनिटला एकमेव गोल केला.

या विजयासह सिटीने आपले गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम तर राखलेच पण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या युनाएटेड मध्ये ८ गुणांचा फरक कायम ठेवला. दोघांचा पुढील प्रिमियर लीगचा सामना मॅन्चेस्टर डार्बी असेल आणि त्यात सिटी आपली दावेदारी अजून मजबूत करते का युनाएटेड गुणांचा फरक कमी करते ते पाहण्यासारखे असेल.

त्यापूर्वी आज झालेल्या सिटीच्या सामन्यात पहिला हाफ वेस्ट हॅमने सिटीपेक्षा वरचढ खेळ दाखवला. जरी बाॅलवर ताबा ठेवण्यात सिटीला यश मिळत असले तरी वेळोवेळी वेस्ट हॅमने आक्रमण केले आणि त्याचाच फायदा त्यांना पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटात झाला.

४४ व्या मिनिटाला उजव्या बाजूने आलेला क्रॅास ओगबोन्ना हेडरने गोल मध्ये रुपांतरीत केला. दुसऱ्या हाफ मध्ये सिटीने आक्रमण चालू केले आणि त्यांना ५७ व्या मिनिटाला त्यात यश मिळाले, गॅब्रियल जिसूसच्या पासवर ओटामेंडीने गोल करत सिटीला १-१ ने बरोबरीत आणले.

सामना शेवटच्या १० मिनिटात गेला असताना परत एकदा सिटीने ८३ व्या मिनिटला गोल नोंदवला. सिटीसाठी असिस्ट मशीन ठरलेला डी ब्रूयने पुन्हा एकदा धावून आला त्याने वेस्ट हॅमच्या सर्व डिफेंडर्सच्या डोक्यावरून दिलेला पास डेविड सिल्वाने फक्त दिशा दाखवत गोलमध्ये रुपांतरित केला आणि २-१ ने आघाडी मिळवून दिली.

डी ब्रूयनेने सिटीमध्ये पदार्पणानंतर युरोपच्या ५ सर्वोत्तम लीगमध्ये सर्वाधिक ३५ असिस्ट नोंदवले आहेत. या मौसमात सिटीतर्फे डी ब्रूयने आणि सिल्वाने ८ तर सानेने ६ असिस्ट केले आहेत.

शेवटच्या १० मिनिटामध्ये युनाएटेडच्या ११ गोल नंतर सिटीचे सर्वाधिक ९ गोल्स आहेत पण युनाएटेडला ११ गोल्सचे २ तर सिटाला ९ गोल्सने ९ गुणांचा फायदा झाला आहे. मागील ३ सामन्यात सिटीने शेवटच्या १० मिनिटातच गोल करत विजय नोंदवला आहे. स्टर्लिंगने हुडर्सफिल्ड समोर ८४ तर साउथ्याप्टन समोर ९६ व्या मिनिटला विजयी गोल केला होता.

प्रिमियर लीगच्या १५ सामन्यांनंतर सिटीचे ४३ गुण हे इतिहासातील सर्वाधिक गुण आहेत. या मौसमात सिटीने २२ सामन्यात २१ विजय तर १ सामना बरोबरीत सोडवला आहे. या २२ सामन्यात त्यांनी ६१ तर प्रतिस्पर्धी संघाने १४ गोल्स केले आहेत. सिटीने १३ सामन्यात पराभवाचे तोंड पाहीले नाही आणि लागोपाठ विजयाच्या चेल्सी, अर्सेनल, सुंदरलॅंड आणि प्रिस्टनच्या विक्रमाची बरोबरी केली.

युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये बार्सिलोना, मॅन्चेस्टर सिटी आणि इंटर मिलान हे तीन संघ अपराजित आहेत. याच आठवड्यात पॅरिस सेंट जर्मन, व्हॅलेंसिया आणि नापोलीला पहिल्या परभवाला सामोरे जावे लागले.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)