इंग्लंडमधील महिला सुपर लीगमध्ये खेळणारी स्म्रिती मानधना पहिली भारतीय

लंडन | भारतीय पुरुष क्रिकेटर्सची सध्या काऊंटी क्रिकेटमधील सहभागावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता स्म्रिती मानधना ही किआ सुपर लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे.

ती महिलांसाठी असलेल्या या लीगमध्ये वेस्टर्न स्ट्रोम या संघाकडून भाग घेणार आहे. या संघाकडून खेळणारी ती दुसरी परदेशी खेळाडू ठरणार आहे.

ही २१ वर्षीय खेळाडू यापुर्वी बिग बॅश लीगमध्येही खेळली आहे. मानधनाने आजपर्यंत ४० टी२० सामन्यात ८२६, ४१ वनडेत १४६४ धावा केल्या आहेत.

तसेच आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यापुर्वी झालेल्या सामन्यात तीने महिलांचा जो एकमेव सामना खेळवला होता त्यात नेतृत्वही केले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

-फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग

टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा 2019चा विश्वचषक ठरणार शेवटचा विश्वचषक