आयपीएल लिलाव: या खेळाडूंना मिळाले ११ करोड

बंगलोर। आयपीएल २०१८ चा लिलाव आज सुरु झाला आहे. या लिलावात तरुण खेळाडूंना चांगली बोली लागली आहे. यात मनीष पांडे आणि के एल राहुल चांगलेच भाव खाऊन गेले.

मनीष पांडे आणि के एल राहुल या दोन्ही खेळाडूंसाठी ११ करोडची बोली लागली आहे. भारतीय खेळाडूंमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक किंमत या दोन खेळाडूंना मिळाली आहे.मनीषला सनरायझर्स हैद्राबादने आणि राहुलला किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केले आहे.

आत्तापर्यंत सर्वाधिक बोली मागच्या आयपीएलला पुण्याच्या संघातून उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या बेन स्टोक्ससाठी लागली आहे. स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघाने १२.५० करोडमध्ये खरेदी केले.