केदार जाधवसाठी कठीण काळ, मनोज तिवारीची गोलंदाजी पाहून चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

हैद्राबाद। काल आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना पार पडला. या सामन्यात हैद्राबादने 13 धावांनी विजय मिळवला. पण सोशल मिडियावर चर्चा झाली ती पंजाबचा खेळाडू मनोज तिवारीच्या गोलंदाजी शैलीची.

या सामन्यात हैद्राबाद फलंदाजी करत असताना 8 व्या षटकात तिवारी गोलंदाजीसाठी आला आणि त्याने लसीथ मलिंगा आणि केदार जाधव यांच्या सारख्याच काहीशा गोलंदाजी शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

त्याच्या अशा गोलंदाजीमुळे ट्विटरकरांनी मात्र मलिंगा आणि केदारच्या गोलंदाजी शैलीशी तुलना करताना अनेक मजेदार ट्विट केले आहेत. 

तिवारीने या सामन्यात हे एकच षटक टाकले.  यात त्याने एकही विकेट न घेता 10 धावा दिल्या.

तिवारीने आयपीएलमध्ये जरी पहिल्यांदाच अशी गोलंदाजी केली असली तरी त्याने याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळताना अशी गोलंदाजी केली आहे.  

त्याला या सामन्यात अष्टपैलू युवराज सिंगच्या ऐवजी जागा मिळाली होती. पण त्याला त्याचा फायदा घेता आला नाही. तो फलंदाजी करताना 1 धावेवर असतानाच बाद झाला.

या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 132 धावा केल्या होत्या. तर पंजाबला या धावांचा पाठलाग करताना सर्वबाद 119 धावाच करता आल्या. 

महत्त्वाच्या बातम्या –

– भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर

पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब

आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग

भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा

कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त

– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने

टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली