तो चूकीचा ट्वीट मांजरेकरांना भोवला, बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने झाप-झाप झापले

१ ऑक्टोबरला बंगाल आणि झारखंड यांच्यात विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यात झारखंडने बंगालवर दोन धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बंगालने प्रथम फलंदाजी करताना झारखंड समोर 268 धावांचे लक्ष ठेवले होते.

त्याला प्रत्युत्तर देताना झारखंडच्या संघाने 49 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 264 धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी शेवटच्या षटकात चार धावांची आवश्यकता होती. मात्र अंधुक प्रकाशामुळे सामना व्हीजेडी पद्धतीनुसार झारखंडच्या संघाला धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
त्यावर माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी ट्विट करून टीका केली होती. संजय मांजरेकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते, ”विजय हजारे ट्रॉफीत बंगाल आणि झारखंड दरम्यान झालेला सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तेथे व्हीजेडी पद्धतीचा अवलंब का करावा लागला? अंधुक प्रकाशाचा सामना का करावा लागला?  कारण की बंगालच्या संघाने 4 तास 18 मिनिटे गोलंदाजीसाठी घेतली”.

संजय मांजरेकरांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ”तुम्हाला जर जाणून घ्यायचे होते की विलंब कशामुळे झाला आहे, तर तुम्ही संघ व्यवस्थापनाला त्या बद्दल विचारायला हवे होते. तुम्ही ट्विटरवर चहात्यांना विचारून चुकीचा संदेश पाठवला आहे.”

त्यावर पुढे प्रतिक्रिया देताना मनोज तिवारीने असे म्हटले आहे, ”यामागे बरीच कारण असून त्यामध्ये एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर जंगालात गेल्यावर सापडण्यासाठी वेळ लागत होता. दुसरं कारण म्हणजे तेथील उष्ण हवामान आणि तिसर कारण म्हणजे सामन्यादरम्यान एका फलंदाजाला शरीरात झालेल्या वेदनांमुळे त्यात वेळ गेला.”

महत्वाच्या बातम्या-