भारताच्या मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांचा अविश्वसनीय विजय

टोक्यो येथे सुरु असलेल्या जपान ओपन चाम्पियनशिप स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि बी.सुमित रेड्डी यांनी अतिशय अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

त्यांनी मलेशियाच्या गोह वी शेम आणि टेन वी कियोंग या ऑलिम्पिक रजत पदक विजेत्या जोडीचा पराभव केला. सय्यद मोदी ग्रां.प्री. गोल्ड २०१५ मध्ये ह्या मलेशियन जोडीचा मनू अत्री आणि बी.सुमिथ रेड्डी यांनी पराभव केला होता.

नॅशनल चॅम्पियन मनु आणि सुमितने सामन्यात १७-१९ च्या पिछाडीवरून वापसी करत वी शेम आणि टेन वी या जगातिल १० व्या क्रमांकाच्या जोडीचा पराभव केला. ५४ मिनीटे चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात  त्यांनी अखेर १५-२१, २३-२१, २१-१९ असा विजय मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला.

उप-उपांत्य फेरीत त्यांचा सामना चीनच्या ही जिटिंग आणि टेन कियांग यांच्याशी होणार आहे.

आज फक्त पुरुष दुहेरी आणि महीला दुहेरीचे सामने झाले. त्यात भारताच्या सात्विकसैराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, महीला दुहेरीच्या सामन्यात अश्विनी पोन्नाप्पा आणि एन.सिक्की रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

कॉमनवेल्थ खेळातील रजत पदक विजेत्या सात्विक आणि चिरागला जपानच्या ३ क्रमांकाच्या ताकेशी कामुरा आणि केईगो सोनाडा यांनी १२-२१, १७-२१ असा सरळसेट मधे पराभव केला. अश्विनी आणि सिक्की यांचा पराभव कोरियाच्या चांग ये ना आणि जंग क्युंग युन यांनी १७-२१, १३-२१ असा केला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-काय आहे मॅकग्राचे अँडरसनला नवीन आव्हान?

-माझ्या या यशामागे फेडरर, नदालचा महत्त्वाचा वाटा- नोवाक जोकोविच

-२६ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा झाला असा पराभव; तर इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप