एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेत चंद्रकांत मानवडकर, विनया मालुसरे, दत्तात्रय जयभाई यांना विजेतेपद

पुणे। पुणे महानगरपालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आणि फायर अँड सेक्युरिटीअसोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरक्षा आणि सुरक्षितता याकरिता जनजागृतीकरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेत चंद्रकांत मानवडकर, विनया मालुसरे, दत्तात्रय जयभाई यांनी 21 किलोमीटर अर्ध मॅराथॉन गटात तर तहझिम खान, ऋजुता गाडगीळ, श्रीगणेश नाडगौडा, सुमित्रा जोशी यांनी 15 किलोमीटर गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेत 3500 हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.21 किमी अंतराच्या एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरू झाली आणि बाणेर व विद्यापीठ मार्गे औंधपर्यत आणि परत बालेवाडी स्टेडियम अशी मार्गक्रमण करत पुर्ण करण्यात आली.

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) मुलांच्या खुला गटात चंद्रकांत मानवडकर याने 1तास 16मिनिटे 11सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर, शांदर सिंग व विजया पडवी यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.मुलींच्या गटात विनया मालुसरे हिने 1तास 28मिनिटे 34सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 15 किलोमीटर मुलांच्या खुला गटात तहझिम खान व मुलींच्या गटात ऋजुता गाडगीळ यांनी अव्वल क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्या व उपविजेत्या तसेच तिस-या स्थानावरील स्पर्धकाला करंडक व पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे, भारत सरकारच्या अग्निशमन विभागाचे सल्लागार डी.के.शमी, फायर सर्व्हिसेस एमआयडीसीचे संचालक संतोष वारीक, एफएसएआयचे अध्यक्ष डॉमिनिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफएसएआयचे सचिव सुरेश मेनन, एफएसएआयच्या मॅरेथॉनचे चेअरमन महेश गव्हाणे आणि रनबडीज क्लबचे अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):

10 किलोमीटर खुला गट: मुले:

1.अनुज कुमार 33:20; 2.लक्ष्मण धारवाडे 34:19; 3. शिखर मुखर्जी 36.29;

10 किलोमीटर खुला गट:मुली:

1. वैष्णवी सावंत 42:44; 2. हेमांगी गोडबोले 51:12; 3.तृप्ती गुप्ता 54:10;

10 किलोमीटर वरिष्ठ गट: पुरुष:

1. प्रदीप कुमार 40:28; 2. रमेश अधचिवालकर 40:31; 3.गौरव 40:45;

10 किलोमीटर वरिष्ठ गट: महिला:

1. कविता रेड्डी 46:38; 2.शोभा देसाई 49:55; 3.झिया चैनी 50:38;

15 किलोमीटर खुला गट: मुले:

1.तहझिम खान 1.06.56; 2.शशिकांत पाटील 1.09.20; 3. जुमान मॅथ्यू 1:10:45;

15 किलोमीटर खुला गट: मुली:

1. ऋजुता गाडगीळ 1.31.29; 2.तृप्ती दलाल 1.37.02; 3. प्रियांका लथ 1: 37:51;

15 किलोमीटर वरिष्ठ गट: पुरुष:

1. श्रीगणेश नाडगौडा 1:13:29; 2. आनंद 1:17:55; 3. संदीप तारकर 1.20.45;

15 किलोमीटर वरिष्ठ गट: महिला:

1. सुमित्रा जोशी 1:23:48; 2. प्रियंवदा 1:26:22; 3.कल्याणी टोपेकर 1:29:25;

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) खुला गट: मुले:

1. चंद्रकांत मानवडकर 1:16:11; 2. शांदर सिंग 1:16:12; 3.विजया पडवी 1:16:22;

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) खुला गट: मुली:

1. विनया मालुसरे 1:28:34; 2. नयन बाळासाहेब 1.29.37; 3. भवनीत 1.39.12;

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष खुला गट

1. दत्तात्रय जयभाई 1:21:42; 2. केशर सुसलादे 1:28:49; 3. शहरील सुलेमान 1:35:14;

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) महिला खुला गट:

1. तन्मया 1:42:15; 2. स्मिता कुलकर्णी 2:04:23; 3.अँजेला पंत 2:20:53.