मारिया शारापोवाचा युजेनी बोशार्डवर पलटवार

कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले होते. त्याला उत्तर देताना शारापोवाने मी याच्या पुढे पुढे आहे. यावर मला काही बोलायचं नाही.

रशियाची खेळाडू असलेली, जगातील सर्वात महागडी महिला टेनिसपटू मारिया शारापोवाने तब्बल १५ महिन्यांच्या बंदीनंतर स्टुटगार्ड ओपनमध्ये जोरदार पुनरागम केले. मेल्डोनियम या उत्तेजक द्रव्य चाचणीत ती दोषी आढळली होती.

 

परंतु स्टुटगार्डच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यावर शारापोवाने बोशार्डवर पलटवार केला. “मला यावर काहीही बोलायचं नाही. मी अशा गोष्टींचा विचार करत नाही.” एका पत्रकाराच्या प्रशाला उत्तर देताना शारापोवा म्हणाली.