विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात उद्या(12 जून) 17 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यातून त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिस बाहेर पडला आहे.

त्याच्या बरगड्यांच्या स्नायुमध्ये ताण आल्याने त्याला या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. स्टॉयनिसला ही दुखापत रविवारी पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्यात झाली आहे.

ऑस्ट्रेलिया संघात त्याला पर्याय म्हणून अष्टपैलू मिशेल मार्शला बोलवण्यात आले आहे. परंतू त्याला अजून स्टॉयनिसचा बदली खेळाडू म्हणून घोषित केलेले नाही.

याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच म्हणाला, ‘मार्कस स्टॉयनिसच्या बरगड्यांच्या स्नायुमध्ये थो़डा ताण आहे. त्यामुळे तो उद्याच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल.’

‘त्यामुळे आम्ही सावधगिरीचा इशारा म्हणून मिशेल मार्शला बोलावले आहे. तसेही तो शुक्रवारी ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर येणार होता. पण आता तो दोन दिवस आधीच येईल.’

स्टॉयनिसने या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे झालेले सर्व तीन सामने खेळले आहेत. तसेच त्याने भारताविरुद्ध 7 षटकात गोलंदाजी करताना 62 धावा देत विराट कोहली आणि एमएस धोनीची विकेट मिळवली होती. पण त्याला या सामन्यात फलंदाजीत काही करता आले नाही. त्याला शून्य धावेवर भुवनेश्वर कुमारने बाद केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या पाच खेळाडूंपैकी एकाला मिळू शकते शिखर धवन ऐवजी टीम इंडियात संधी

विश्वचषक २०१९: भारत-न्यूझीलंड सामना होऊ शकतो रद्द, जाणून घ्या कारण

…तर युवराजला खेळता आला असता निवृत्तीचा सामना