मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान

सहा वेळा जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा जिंकणाऱ्या भारताच्या मेरी कोमने ताज्या एआयबीएच्या क्रमवारीनुसार अव्वल स्थान पटकावले आहे.

सहा वेळा जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा जिंकणारी प्रथमच मेरी महिला बॉक्सर ठरली होती. 36 वर्षीय मेरीने 45-48 किलो वजनी गटात खेळताना 1700 गुण कमावले आहेत.

मेरीने नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एआयबीए (जागतिक बॉक्सिंग संघटना) जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. यामध्ये तिने 48 किलो वजनी गटात युक्रेनच्या ह्वाना ओखोटाला तीने 5-0 ने पराभूत केले होते.

या स्पर्धेतील पदकापुर्वी ती आयरीश बाॅक्सर कॅटी टेलरसह सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी होती.

मेरी बरोबरच भारताच्या पिंकी जांग्रा 51 किलो वजनी गटात तर मनिषा मौन 54 किलो वजनी गटात आठव्या क्रमांकावर आहेत.

यापुर्वी मेरीने जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत 6 पदके मिळवली असून हे तिचे 7वे पदक होते. मेरीने या स्पर्धेत आजपर्यंत 6 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावले आहे. 2018 आधी तिने 2010मध्ये 48 किलो वजनी गटात शेवटचे सुवर्णपदक पटकावले होते.

ओखोटा 1100 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी मेरी 2020च्या टोकियो ऑलिंपिकला मुकण्याची शक्यता आहे. कारण या स्पर्धेत 48 किलो वजनी गटचा समावेश नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

देशात या २० शहरांमध्ये होणार २०१९चे आयपीएल

२०१९ विश्वचषकासाठी कोणत्याही खेळाडूच्या जागेबद्दल नाही खात्री!

केवळ २० वय असेलल्या त्या खेळाडूचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश