दक्षिण आफ्रिकेत टेन्शनमध्ये असणाऱ्या टीम इंडियाला सचिनचा खास संदेश

मुंबई । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात मैदानावर झगडत असलेल्या टीम इंडियाला मास्टर ब्लास्टरने खास संदेश दिला आहे. सचिनने ट्विट करून टीम इंडियाला प्रोत्साहित केले आहे.

सचिनने आज चौथ्या दिवसाचा सामना सुरु झाल्यावर थोड्याच वेळात ट्विट केला आहे. ” कम ऑन इंडिया. सामन्यात काहीही होऊ शकते. ” असा सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन दुसरा असून त्याने १५ सामन्यात ४६.४४च्या सरासरीने ११६१ धावा केल्या आहेत. यामुळे सचिनने असा प्रोत्साहनपर ट्विट करणे हे नक्कीच टीम इंडियासाठी सकारात्मक गोष्ट ठरावी.