मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अशा दिल्या वॉल राहुल द्रविडला शुभेच्छा !

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास फोटो शेअर करत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने ट्विटरच्या माध्यमातून या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

“जगात खूप बळकट अशा भिंती(वॉल) आपल्याला माहित असतील परंतु यातील सर्वात भक्कम आणि महान भिंत (वॉल) ही म्हणजे राहुल द्राविड आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जॅमी. तुला अंडर १९ क्रिकेट विश्वचषकासाठी शुभेच्छा. “

राहुल द्रविड आज वयाची ४५ वर्ष पूर्ण करत आहे. तो सध्या भारतीय अंडर १९ संघाचा प्रशिक्षक असून संघासोबत न्यूझीलँडला विश्वचषकासाठी गेला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही तिकडी भारताकडून एकत्र तब्बल ११८ सामने खेळली आहे. हा एक मोठा विक्रम आहे. भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळात द्रविड आणि सचिन हे भारतीय संघाचे अविभाज्य भाग होते.