चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ

मुंबई  | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात झाली. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आज नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 

या सामन्यातून २ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.  मागील दोन वर्ष चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली होती.

त्यामुळे दोन वर्षानंतर पुनरागमन करून चेन्नई आपला पूर्वीचाच दबदबा कायम ठेवते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर गतविजेते मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्सला भारी पडले आहेत.

चेन्नईची फक्त मुंबई संघाविरुद्ध विजयाची सरासरी ५०% पेक्षा कमी आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई घराच्या मैदानावर आपला जलवा दाखवते की चेन्नईचे पुनरागमन विजयाने होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स:  एव्हिन लेविस, ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, मयांक मार्कंडे, किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, मिचेल मॅकग्लेन, मुस्तफिजूर रेहमान, जसप्रीत बुमराह, 

चेन्नई सुपर किंग्स : शेन वॉटसन, आंबती रायडू,सुरेश रैना, केदार जाधव,एम एस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो,  रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चाहर,इम्रान ताहीर, मार्क वूड