प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात जयपूरकडून यूपी पराभूत

जयपूर पिंक पँथर्सने काल झालेल्या रोमहषर्क सामन्यात यू पी योद्धजला २२-२४ अशी मात दिली. यू पी योद्धाजचा हा घरच्या मैदानावरील सलग तिसरा प्रभाव होता. त्यांना गुजरात प्रमाणे घरच्या मैदानावरील सामन्यांचा फायदा घेता आलेला नाही.

कालच्या सामन्यात जयपूरचा वन मॅन आर्मी मानला जाणारा मनजीत चिल्लर दुखापतीमुळे खेळला नाही आणि जयपूरच्या आधीच्या मोसमातील कर्णधार जसवीर सिंगने संघाचे नेतृत्व केले. जयपूरच्या संघाने दुसरे सत्र संपायला २ मिनिट राहिले असताना यू पीला सर्वबाद केले आणि सामना आपल्या खिशात घातला.

शेवटच्या काही क्षणात नितीन रावलने दोन रेड नितीन तोमर आणि रिशांक देवाडिगाला बाद केले आणि त्यानंतर यू पी चा संघ कोलमडला. जयपूरच्या तुषार पाटीलने पहिल्या सत्राच्या ९व्या मिनिटाला सुपर रेडकरून संघाला बढत मिळवून दिली. पण त्यानंतर यू पी योद्धाजने पाटीलला सुपर टॅकल करून सामन्यात पुनरागमन केले.

यू पीचा कर्णधार नितीन तोमरला जरी आपला फॉर्म राखता आला नसला तरी दुसऱ्या बाजूला जयपूरने सांघिक कामगिरी करून सामना जिंकला.