हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे मॅच फिक्सिंग- एमएस धोनी

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यातच हॉटस्टारवर लवकरच धोनीचा आत्तापर्यंतचा प्रवास उलगडणारी ‘रोअर ऑफ द लायन’ डॉक्यूमेंट्री वेबसिरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना याची उत्सुकता आहे.

या डॉक्यूमेंट्रीचा नुकताच 45 सेकंदाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये धोनीने म्हटले आहे की त्याच्यासाठी सर्वात मोठा गुन्हा हत्या नसून मॅच फिक्सिंग आहे.

ही डॉक्यूमेंट्री मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये केलेल्या दमदार पुनरागमनावर केंद्रीत आहे. धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर 2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती.

या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्जने 2018 ला आयपीएलमध्ये पुनरागमन करत धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपदही पटकावले. हे चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलेले तिसरे आयपीएल विजेतेपद ठरले होते.

याबद्दल ‘रोअर ऑफ द लायन’ या डॉक्यूमेंट्री ट्रेलरमध्ये बोलताना धोनी म्हणाला, ‘संघाचा यात(स्पॉट फिक्सिंग) समावेश होता. माझ्यावरही आरोप लावण्यात आले होते. आमच्या सर्वांसाठीच हा कठिण काळ होता. चाहत्यांना वाटत होते की ही बंदी खूप कठोर आहे. पुनरागमन करणे भावूक होते आणि मी नेहमी म्हणतो, ज्यामुळे तूम्ही मरत नाही ते तूम्हाला मजबूत करते.’

या 2013 ला उघडकीस आलेल्या मॅच फिक्सिंगबद्दल धोनीने कधीही याआधी भाष्य केले नव्हते. जूलै 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉसल्स संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आले होती.

कारण त्यांच्या संघातील गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा हे मोठे अधिकारी 2013 च्या आयपीएल मोसमातील बेटिंग प्रकरणात दोषी आढळले होते. तसेच त्यामुळे या दोघांवरही बीसीसीआय आयोजित करत असलेल्या कोणत्याही क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यास आजीवन बंदी घालण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

कारकिर्दीतील पहिलाच षटकार मारणाऱ्या बुमराहचा हा अनोखा कारनामा…

बुमराहचा तो षटकार पाहुन कर्णधार कोहलीही झाला अचंबित, केले असे सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ

अशी आहे किंग कोहलीची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाची कामगिरी