कोण ठरणार वरचढ ? मुंबई की कोलकाता?

 

आज आयपीएल २०१७ चा दुसरा एलिमिनटर सामना बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना १०व्या मोसमातील दोन बलाढ्य संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणार आहे. मुंबई इंडिन्स या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायन्ट या संघाकडून पराभूत झाला आहे तर कोलकाता नाईट रायडर्सने सन रायझर्स हेंद्राबाद संघाला याच मैदानावर हरवून एलिमिनेटवरमध्ये प्रवेश केला आहे.

दोनीही संघ या वर्षी आयपीएल जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. रोहित शर्माने सुरेख नेतृत्व करत मुंबईला अंतिम ४ मध्ये आणले आहे, तर गौतम गंभीरने फलंदाजी व नेतृत्व या दोंन्हीचा सुरेख समन्वय राखत कोलकाताला इथवर आणले आहे. कोलकाता हा सामना आपल्या लयमध्ये असेलल्या मधल्या फळीचा स्टार फलंदाज मनीष पांडे शिवाय खेळेल. तर मुंबई संघाला विदेशी खेळाडू सोडून विशेष काही फरक पडणार नाही. कारण मुंबईच्या राखीव खेळाडूनी त्याची जागा भरून काढली आहे.

आतापर्यंत या दोनी संघात झालेल्या १८ सामन्यात १३ सामने हे मुंबई इंडियन्सने तर ५ सामने कोलकाताने जिंकले आहेत. या दोनही संघाने २ वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे.

 

पाहुयात या दोन्ही संघाचे आज खेळणारे खेळाडू:

मुंबई इंडियन्स
लेंडन सिमन्स, पार्थवी पटेल, रोहित शर्मा, आंबती रायडू, किएरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, हरभजन सिंग, करण शर्मा, मिचेल मॅकॅलेघन, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह
कोलकत्ता नाईट रायडर्स

ख्रिस लिन, सुनील नारायण,  गौतम गंभीर, रॉबिन उत्तपा, निशंक जग्गी,  युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट,  उमेश यादव,  नॅथन कुलटरनील