चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी नेटकऱ्यांचे शिकार, या कारणासाठी केले जोरदार ट्रोल

प्रीमियर लीगमधील चेल्सी विरुद्ध हडर्सफिल्ड सामन्याच्या वेळी चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी हे सिगारेट चावताना आढळले.

सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. ११ ऑगस्टला झालेल्या सामन्यात त्यांच्या या वागणुकीचे फोटोज ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. मैदानावर धुम्रपान करण्यास मनाई असल्याने ते सिगारेटओढत नसून चावत होते त्यामुळे याप्रकरणी नेटकऱ्यांनी त्यांची जोरदार खिल्ली उडविली आहे.

सॅरी यांनी या वर्षीच चेल्सीच्या प्रशिक्षकपदाचा कार्यभार हाती घेतला आहे. तसेच हा सामना चेल्सीने ३-० अशा फरकाने जिंकला.

यामध्ये मिडफिल्डर एनगोलो कांटे (३४व्या), हॉर्हीनियो (४५व्या) आणि पेड्रो (८०व्या) यांनी गोल केले. या सामन्यात चेल्सी ४-३-३ च्या फॉर्मेशनने खेळला. तसेच त्यांनी पाच वेळा या लीगचे विजेतेपद पटकावले आहे.

तसेच चेल्सीचा या लीगमधील पुढील सामना अर्सेनल विरुद्ध १८ ऑगस्टला होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनी म्हणतो, दहा वर्षानंतर पुन्हा जाग्या झाल्या या क्षणाच्या आठवणी

रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण