मॅक्सवेल पंजाबचा १०वा कर्णधार..!!

*सर्वाधिक कर्णधार बदललेला संघ*

प्रीती झिंटा या बॉलीवूड अभिनेत्रीच्या मालकीचा असलेला आयपीएलमधील किंग्स इल्लेवन पंजाब या संघाने एक नवीनच विक्रम आपल्या नावावर केला आहे. या संघाने आजवरच्या आयपीएलच्या सर्व पर्वामध्ये मिळून १० कर्णधार बदलले आहेत, जे की बाकी संघानंपेक्षा खूप जास्त आहेत.

आयपीएलच्या पहिल्या पर्वानंतर पंजाबला काही चांगला खेळ करून दाखवता आला नव्हता. पहिल्या पर्वात उपांत्यफेरी पर्यंत मजल मारल्या नंतर सहाव्या पर्वामध्ये त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. पण बाकी पर्वात त्यांना चांगली कामगिरी करायला जमले नाही. पाहुयात या आधीचे पंजाबचे कर्णधार आणि त्यांची कामगिरी.

साल कर्णधार कामगिरी
२००८युवराज सिंगउपांत्यफेरी
२००९कुमार संगकाराआठवा क्रमांक
२०१०माहेला जयवर्धनेपाचवा क्रमांक
२०११ऍडम गिलक्रिस्टसहावा क्रमांक
२०१२ऍडम गिलक्रिस्टसहावा क्रमांक
२०१३ऍडम गिलक्रिस्ट आणि डेविड हसीसहावा क्रमांक
२०१४जॉर्ज बेलीदुसरा क्रमांक
२०१५डेविड मिलरआठवा क्रमांक
२०१६मुरली विजयअथवा क्रमांक

आता पंजाबच्या संघाची धुरा ग्लेन मॅक्सवेलकडे देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा या आयपीएल पर्वातला मॅक्सवेल तिसरा कर्णधार आहे. पुण्याचे नेतृत्व स्मिथ तर हैदराबादचे नेतृत्व वॉर्नर करत आहे. आता पंजाबच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की नवीन कर्णधारामुळे तरी पंजाब चांगला खेळ करेल का ?