ऍशेस २०१७: ग्लेन मॅक्सवेलला वॉर्नरसाठीचा राखीव खेळाडू म्हणून संधी

उद्यापासून सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठीचा राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया संघात संधी देण्यात आली आहे.

वॉर्नर सध्या मानेच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्याला काल झालेल्या सराव सत्रात या दुखापतीचा त्रास झाला. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आले आहे. त्याला अजूनतरी संघातून वगळलेले नाही त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठीच्या संघ निवडीसाठी उपलब्ध असेल.

याविषयी बोलताना ऑसी कर्णधार स्टीवन स्मिथ म्हणाला ” ते यावेळी बदली खेळाडू बोलावण्याचा विचार करत आहेत, परंतु डेव्हिडला विश्वास आहे की तो बरा होईल.”

” दुखापत हि एक क्रिकेटचा भाग आहे. तो म्हणाला आहे की त्याला जर शिवनारायण चंद्रपॉल सारखी फलंदाजी करावी लागली तरी तो करेल. त्यामुळे मला वाटते की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल.”

स्मिथ पुढे म्हणाला ” मागील २४ तासात त्याच्या दुखापतीत सुधारणा झाली आहे. आशा आहे की तो उद्या सकाळी १० वाजेपर्यंत १०० टक्के बरा होईल. “