१० कोटी आणि १९ दिवस खर्च करुन बनवले होते फेडरर-नदालसाठी हे खास कोर्ट

टेनिसमध्ये महिला आणि पुरुषांचा एकेरीचा सामना तसेच पाण्यावर कोर्ट बनवुन खेळवला गेलेला सामना सर्वांनाच माहित आहे. परंतु २००७ साली तेव्हाचा क्ले कोर्ट किंग राफेल नदाल आणि ग्रास कोर्ट किंग राॅजर फेडररमध्ये एक खास सामना झाला होता. 

हा सामना चक्क अर्धे ग्रासचे तर अर्धे क्ले कोर्ट अशा टेनिस मिश्र कोर्टवर झाला होता. तब्बल ११ वर्षांपुर्वी या दोन खेळाडूंनी संपुर्ण टेनिस विश्व व्यापले होते आणि आजही काही वेगळी परिस्थिती नाही. 

नदाल आणि फेडरर चाहत्यांमध्ये कोण श्रेष्ट याची तेव्हा कायमच चर्चा व्हायची. त्याचे उत्तर हे सध्या मिळालेले आहे किंवा या दोन खेळाडूंनी आपली मैत्री करत ते वाद एकप्रकारे शांत केले आहेत. 

तेव्हा ७२ सामन्यात नदाल क्ले कोर्टवर पराभुत झाला नव्हता. पुढे त्याला फेडररने पराभुत करत ही मालिका खंडित केली. तर फेडरर ग्रास कोर्टवर सलग ४८ सामने अपराजित होता. 

त्यामुळे नदालच्या पाल्मा डी मलोर्का या गावी एक खास प्रदर्शनीय सामना या दोन खेळाडूंमध्ये घेण्याचे ठरले. तेव्हा नदालचे वय होते २१ वर्ष तर फेडररचे २६. 

हा सामना २ मे २००७ रोजी घेण्याचे ठरले. यासाठी तब्बल १० कोटी रुपये आणि १९ दिवस खर्च करुन एक खास कोर्ट बनवण्यात आले. यात एक बाजूला क्ले कोर्ट तर दुसऱ्या बाजूला ग्रास कोर्ट होते. याचा मुळ उद्देश होता दोन्ही खेळाडूंच्या बलस्थानांना योग्य न्याय देता यावा. 

तब्बल २ तास आणि २९ मिनीटे चाललेल्या या सामन्यात बेस्ट आॅफ ३ सेटमध्ये नदालने फेडररवर ७-५, ४-६, ७-६(१०) असा विजय मिळवला. 

विशेष म्हणजे या सामन्यात फेडररला दोन वेळा मॅच जिंकण्याची संधी होती परंतु नदालने हे मॅच पाॅईंट वाचवत हा सामना जिंकला. 

पहिला सेट नदाल जिंकला त्यात तो ग्रास कोर्टवर खेळत होता तर दुसरा सेट फेडरर जिंकला तेव्हा तो क्ले कोर्टवर खेळत होता. तिसरा आणि निर्णायक सेट नदाल ग्रास कोर्टवर जिंकला हे विशेष. 

महत्त्वाच्या बातम्या –

आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त

दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले

हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!

राॅजर फेडररची का होतेय आज मोठी चर्चा?

मलिंगाला श्रीलंकाकडून खेळण्यापेक्षा मुंबई इंडियन्स प्रिय