मयांक अग्रवालचा धावांचा रतीब काही थांबेना, पुन्हा एकदा खणखणीत खेळी

अलुर | चौरंगी मालिकेत भारत ब कडून खेळताना मयांक अग्रवालने आज पुन्हा शतकी खेळी करत संघाला विजय मिळवुन दिला. भारत अ विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ११४ चेंडूत १२४ धावा केल्या. यात त्याच्या १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारत अचा कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीचा निर्णय घेतला. ४९ षटकांत अ संघ २१७ धावांवर सर्वबाद झाला.

५० षटकांत २१८ धावांचे लक्ष घेऊन मैदानात अालेल्या भारत बला अग्रवाल आणि इशांत किशनने १०.४ षटकांत ५० धावांची सलामीलाच भागीदारी करुन दिली.  इशांत किशन बाद झाल्यावर अग्रवालला शुभमन गीलने ४२ धावा करत चांगली साथ दिली. हा सामना भारत ब ने केवळ ३ विकेट्स गमावत ४१.१ षटकांतच खिशात घातला.

याबरोबर अग्रवालने अनेक विक्रमही केले. २०१८मध्ये अ दर्जाच्या सामन्यांत सर्वाधिक धावा, चौकार आणि शतके करण्याचा विक्रम त्याने केला आहे. तसेच टी२०, अ दर्जा आणि प्रथम श्रेणीचे सामने मिळुन त्याने २००० धावांचा टप्पा २०१८मध्ये पार केला आहे.अशी कामगिरी करणारा तो यावर्षीचा केवळ चौथा खेळाडू आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा

 ८२ वर्षांत जे कुणालाही जमले नाही ते विराट ब्रिगेडला करण्याची संधी

– भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक

केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश

एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक