मयंती लँगरने करवा चौथ निमित्त पती स्टुअर्ट बिन्नीसाठी असा केला उपवास

भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुर्ट बिनीची पत्नी मयंती लँगर ही स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर सूत्रसंचालक म्हणून काम करते. सध्या ती क्रिकेट सामन्यात सूत्रसंचालन करते. तिने या किरकिर्दीची सुरुवात फुटबॉल या खेळाचं सूत्रसंचालक म्हणून केले होते.

काही काळापूर्वी केपीएलमध्ये स्वतःच्याच पतीची म्हणजे स्टुर्ट बिनीची मुलाखत घेतल्याबद्दल ती चर्चेत आली होती. तो विडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि लोकांना तो खूप आवडलाही होता.

८ तारखेला भारतात सर्वत्र करवा चौथ साजरी केली जात होती. यामध्ये भारतीय पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यसाठी दिवसभर उपवास करते.

आता भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिका सुरु आहे आणि त्याचे सूत्रसंचालन मयंती करत आहे. या सर्व व्यस्त कार्यक्रमातही मयंतीने उपवास केला होता. पण तिचा सहकारी जतीन सप्रूने ट्विटरवर एक फोटो शेयर करून मयंतीचे हे रहस्य सर्वांच्या पुढे आणले.

या फोटोमध्ये जतीन सप्रू मयंती लँगर आणि अर्जुन पंडित हे तिघे एका सोफ्यावर बसले आहेत. त्यांच्या समोर टेबलवर २ कॉफीचे ग्लास ठेवले आहेत आणि त्या फोटो खाली जतीनने असे लिहले आहे की ” २ कॉफी आणि एक करवा चौथ ” याचा अर्थ असा की मयंतीचा काल उपवास होता.