मयंती लँगरला हवा सुरेश रैनाच्या वायफायचा पासवर्ड !

कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वनडे सामन्यादरम्यान टेलिव्हिजन अँकर मयंती लाँगेरने एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. ज्यात भारतीय फलंदाज सुरेश रैनाच्या नावाचे वायफाय नेटवर्क दिसत आहे. या ट्विटमध्ये तिने रैनाला त्याचा पासवर्डविषयी विचारले आहे.

या तिच्या पोस्टवर रैनाच्या अनेक चाहत्यांनी तिला ट्विट केले आहे. सध्या रैना उत्तर प्रदेश संघाकडून रणजी सामन्यात खेळत आहे. त्याला भारतीय संघात स्थान दिले गेलेले नाही.

सुरेश रैना नुकताच भारतीय संघात निवड होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या यो यो टेस्टमध्ये अपयशी झाला आहे. त्यामुळे त्याला त्याचे भारतीय संघातील स्थान गमवावे लागले.