IPL 2018- तिसऱ्याच आयपीएल सामन्यात एका मोठ्या विक्रमाचा धमाका!

0 208

कोलकाता। आयपीएल २०१८ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये इडन गार्डन, कोलकाता येथे सामना सुरू आहे. या सामन्यात कोलकाताचा नवीन कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाताकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या ब्रेंडन मॅक्क्यूलमने आज ट्वेंटी20मध्ये एक खास विक्रम केला. टी20 सामन्यात त्याने 9000 धावांचा टप्पा पार केला. 

ट्वेंटी20सामन्यात 9000 धावा करणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी ख्रीस गेलने 323 सामन्यात 11068 धावा केल्या आहेत. 

तर ब्रेंडन मॅक्क्यूलमने 330 सामन्यात 31च्या सरासरीने 9013 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या 7 शतके आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे. 

आयपीएलमध्ये या खेळाडूने 71 सामन्यात 2140 धावा केल्या आहेत. 

ट्वेंटी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू- 

11068- ख्रीस गेल

9013-  ब्रेंडन मॅक्क्यूलम

8048- केराॅन पोलार्ड

7728- शोएब मलिक

7768- डेविड वार्नर

 

Comments
Loading...
%d bloggers like this: