जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘एम सी ई सोसायटी’च्या ‘इंग्लिश मीडियम स्कूल’ला जेतेपद

पुणे: ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या इंग्लिश मीडियम स्कूल’च्या  विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय आंतरशालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळाले आहे. 14 वर्षे वयोगटातील या स्पर्धेचा अंतिम सामना ‘एम सी ई सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल’ आणि ‘पी.ई.एस.इंग्लिश मीडियम स्कूल’ यांच्यात झाला. ‘इंग्लिश मीडियम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी 9-1 ने लढत जिंकली.

ही स्पर्धा ‘जिल्हा क्रीडा परिषद’ पुणे व ‘शिक्षण विभाग’ पुणे महानगर पालिकाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

आझम कॅम्पस मैदानावर दिनांक 26 सप्टेंबर रोजी स्पर्धा पार पडली.

‘पी.ई.एस.इंग्लिश मीडियम स्कूल’ उपविजेते आणि ‘महेश विद्यालय माध्यमिक शाळा’ तृतीय क्रमांकावर आले.

विजेत्या संघाचे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक गुलजार शेख, शाळेच्या मुख्याध्यापक रबाब खान यांनी अभिनंदन केले.

हुजेफा सय्यद, फुरकान खान यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.