मुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स!

0 52

लखनऊ । येथे सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफी इंडिया रेड विरुद्ध इंडिया ग्रीन सामन्यात कसोटीपटू मुरली विजयने चक्क तीन विकेट्स घेऊन सर्वांचं आश्चर्यचकित केले आहे. इंडिया ग्रीन कडून गोलंदाजी करताना त्याने ही कामगिरी केली.

इंडिया रेड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी ११०.५ षटकांत सर्वबाद ३२३ धावा केल्या. यात भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने चक्क ११.५ षटके गोलंदाजी केली. यात ४६ धावा देत त्याने ईशांक जग्गी, रिषभ पंत आणि अशोक दिंडा यांना बाद केले.

विशेष म्हणजे भारतीय संघात सध्या नसलेला परंतु कसोटीमध्ये भारताकडून त्रिशत्रक केलेल्या करून नायरने देखील इंडिया ग्रीनकडून ५ षटकांत १७ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक:
इंडिया रेड: ११०.५ षटकांत सर्वबाद ३२३

Comments
Loading...
%d bloggers like this: