मेलबर्न व्हिक्ट्रीने केले या जपानी स्टार खेळाडूला ३ मिलीयन डॉलरमध्ये करारबद्ध

ऑस्ट्रेलियन ए लीगला केईसुके होंडाच्या स्वरूपात एक नवीन मोठा फुटबॉलपटू मिळाला आहे. मेलबर्न व्हिक्ट्रीने या जपानी स्टार खेळाडूला ३ मिलीयन डॉलरमध्ये करारबद्ध केले आहे.

तसेच या ३२ वर्षीय खेळाडूने मागील तीन फिफा विश्वचषकात गोल केले आहेत.असा करणारा तो पहिलाच आशियाई खेळाडू ठरला. जपानकडून खेळताना त्याने ९८ सामन्यात ३७ गोल केले. रशियात झालेल्या फिफा विश्वचषकातुन जपान बाहेर पडल्याने होंडाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.

माजी एसी मिलान आणि सीएसकेए मॉस्को खेळाडू होंडा हा शिंजजी ओनो, एलेस्सेंड्रो डेल पियोरो, एमिले हेस्की आणि डेव्हिड व्हिला हे २०१३-१४ हंगामात ऑस्ट्रेलियामध्ये चांगले खेळले होते.

फिफा २०१८ मध्ये सेनेगल विरुद्ध गोल केल्यावर व्हिक्ट्रीचेे प्रशिक्षक केविन मस्कट यांनी त्याला घ्यायचे ठरवले होते. तसेच त्याने सीएसकेए मॉस्कोकडून खेळताना ९४ सामन्यात २० गोल केले.

“फिफा विश्वचषकातनंतर व्हिक्ट्रीने माझा एजेंट आणि भाऊ याच्याशी संपर्क साधला होता,”असे होंडा म्हणाला.

“ए लीगमध्ये हा संघ मागील १३ वर्षांपासून खूप यशस्वी असून त्यांनी याचे विजेतेपद पण जिंकले आहे. या संघाचा भाग होणे यामुळे मला खूप आनंद होत आहे.”

“या खेळाडूने आंतरराष्ट्रीय तसेच लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मला विश्वास आहे की तो यामध्येही अशीच कामगिरी करेल”, असे मस्कट म्हणाले.

फुटबालच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि जपान हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहे.

ऑस्ट्रेलियन चाहत्यांना माझ्या खेळाने मी खुश करण्याचा प्रयत्न करेन, असेही होंडा पुढे म्हणाला.

जपानफुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर होंडाने हॉलिवूड स्टार विल स्मिथ सोबत स्टार्टअप कंपन्यांसाठी अमेरिकेत ‘ड्रीमर्स फंड’ सुरू केला आहे.

होंडा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक खंडातील देशा विरुद्ध गोल केले. विश्वचषकात आशियातील खेळाडूमध्ये सर्वाधिक गोल त्याच्याच नावावर आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कुठे गेला तुमचा कोहली?

-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी