आजच्या सामन्यात मेराज शेख करणार मोठा विक्रम

प्रो कबड्डीचा मुक्काम सध्या दिल्ली येथे आहे. मागील दोन्ही सामने दिल्ली संघाने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना यु मुंबाकडून पराभूत व्हावे लागले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पुणेरी पलटण संघाने नमवले. पहिल्या सत्रात पुणेरी पलटण विरुद्ध सुस्थिती असताना त्यांनी दुसऱ्या सत्रात खराब कामगिरी केली. त्यामुळे त्यांना पलटण संघ विरुद्धचा सामना गमवावा लागला आहे.

आज दबंग दिल्ली संघाचा सामना हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात दबंग दिल्ली संघाचा कर्णधार मेराज शेख याला या सामन्यात काही मोजक्या खेळाडूंच्या यादीमध्ये जाण्याची संधी आहे. दिल्ली संघाच्या कर्णधाराच्या नावावर प्रो कबड्डीमध्ये ५६ सामने खेळताना २४३ गुण आहेत. त्यात त्याने रेडींगमध्ये १९६ तर डिफेन्समध्ये त्याने ४७ गुण मिळवले आहेत.

# आपल्या ऑलराऊंडर खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मेराजने आजच्या सामन्यात जर एकूण सात गुण मिळवले तर त्याचा नावावर २५० गुण होतील. तो २५० गुण मिळवणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश करेल.

# आजच्या सामन्याअगोदर मेराजच्या नावावर रेडींगमध्ये १९६ गुण आहेत. आज त्याने रेडींगमध्ये चार गुण मिळवले तर त्याच्या समावेश २०० रेडींग गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होईल.

# सध्या मेराजच्या नावावर डिफेन्समध्ये ४७ गुण आहेत. आजच्या सामन्यात जर त्याने डिफेन्समध्ये तीन गुण मिळवले तर तो ५० डिफेन्स गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश होईल.

# मेराजने आजच्या सामन्यात एकूण सात, डिफेन्समध्ये ३ आणि रेडींगमध्ये चार गुण मिळवले तर त्याचा समावेश त्या त्या यादीत होईल. परंतु या मोसमात रेडींगची जास्त जबाबदारी स्वीकारणाऱ्या मेराजला डिफेन्समध्येही उत्तम कामगिरी करत तिन्ही यादीत समाविष्ट होण्याची उत्तम संधी आहे.