प्रो कबड्डी: दबंग दिल्लीचा परदेशी खेळाडू कर्णधार

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमासाठी दबंग दिल्ली संघाने परदेशी खेळाडूची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. इराणचा मिरज शेख पाचव्या मोसमात दबंग दिल्ली संघाचं नेतृत्व करणार आहे.
दबंग दिल्लीचा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्या चार मोसमात त्यांच्या नावाप्रमाणे काहीकमाल दाखवू शकलेला नाही.दबंग दिल्ली संघाने दुसऱ्या मोसमात चांगला खेळ केला परंतु आजपर्यंत या संघाला कधीही ५ किंवा त्याआधीचा क्रमांक मिळवता आलेला नाही. दबंग दिल्लीचा माजी खेळाडू असणारा काशीलिंग अडके हा प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमातील सर्वोत्कृष्ट रेडर होता तर दबंग दिल्लीचाच रविंदर पहल हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट डिफेंडर होता.

एकदाही सेमी फायनलपर्यंत न गेलेल्या दबंग दिल्ली संघाने इराणला कबड्डी विश्वचषकात अंतिम सामान्यांपर्यंत घेऊन गेलेला इराणच्या कबड्डी संघाचा कर्णधार मिराज शेख याला दबंग दिल्ली संघाचा कर्णधार घोषित केले आहे. मिराज शेख हा एक अष्टपैलू खेळाडू असून तो त्याच्या फ्रॉग जम्प,डुबकी आणि टो टच या कबड्डीतील स्किल्ससाठी प्रो कबड्डीमध्ये खूप लोकप्रिय खेळाडू आहे.

मिराज शेख याने प्रो कबड्डीमध्ये खेळताना ४३ सामन्यात खेळताना १६१ गुण मिळवले आहेत त्यातील ११९ रेडींगमधील गुण आहेत तर उर्वरित ४२ डिफेन्समधील गुण आहेत. ९१ पकडी करण्यासाठी तो संघाच्या मदतीला धावला पण त्यातील ३६ यशस्वी तर ५५ अयशस्वी पकडी झाल्या.