बार्सिलोनाची विजयी घौडदौड सुरुच तर रियल मॅड्रिडला ड्राॅ’चा धक्का

२०१८ या नववर्षातील ला लीगाचा पहिला सामना खेळणाऱ्या आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या बार्सिलोनाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यांनी एकही सामना न गमावता १८ सामन्यात १५ विजयांसह ४८ गुण आहेत तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ॲटलेटिको डी मॅड्रिडपेक्षा ते ९ गुणांनी पुढे आहे.

मागील ट्रांस्फर विंडोमध्ये घेतलेल्या डेम्बेलेने तब्बल ४ महिन्यानंतर कॅम्प नाऊमध्ये सामना खेळला. आज त्याला पहिल्या ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते.

सामन्याच्या पहिल्या हाफपासुनच बार्सिलोनाने आक्रमण चालू केले. त्याचा परिणाम १२ व्या मिनिटलाच दिसला. या मौसमात अप्रतिम खेळत असलेल्या मेस्सी आणि अल्बाच्या जोडीने आज परत एकदा गोल करुन बार्सिलोनाला आघाडी मिळवुन दिली. पुढच्याच मिनिटाला एक अप्रतिम गोल वाचवत लेवान्टेने सामना १-० असा चालू ठेवला.

पहिल्या हाफच्या शेवटच्या १० मिनिटमध्ये ३७ व्या मिनिटला सर्जी रोबर्टोने दिलेला पास सुवारेझने गोलपोस्टमध्ये टाकत २-० ची आघाडी मिळवून दिली. सुवारेझने मागील सहा सामन्यात लागोपाठ गोल करत बार्सिलोनाला अजुन तरी नवीन स्टाईकर शोधायची गरज नाही दाखवून दिले.

दूसरा हाफ बार्सिलोनाने आपला स्वाभाविक खेळ करत बाॅल आपल्या ताब्यात ठेवला. अतिरिक्त वेळेत ९३ व्या मिनिटला मेस्सीने डिफेंडर्सला चकवत पास दिला आणि त्याला दिशा दाखवत पाॅलिन्होने गोल केला.

सामन्यातील काही खास विक्रम:-
#इनिएस्टाचा हा बार्सिलोनासाठीचा ६५० वा सामना होता.
# मेस्सीचा ला लीगाचा हा ४०० वा सामना होता.
# मेस्सीने ४०० सामन्यात ३६५ गोल्स आणि १४४ असिस्ट आपल्या नावे केलेत.

इतर ला लीगाच्या सामन्यात रियल मॅड्रिडला सामना बरोबरीत सोडवून एक गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यानंतर रियल मॅड्रिड गुणतालीकेत १७ सामन्यात ३२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.