#MeToo Movement: अर्जुना रणतुंगापाठोपाठ लसिथ मलिंगावरही झाले आरोप

अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता ‘मी टू'(#MeToo) या मोहिमेला सोशल मिडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

याच मोहिमेचा आधार घेत एका अज्ञात महिलेने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगावर ही लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल वाचा फोडताना भारताची गायिका चिन्मयी श्रीपदा हीने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्या महिलेबरोबर घडलेली घटना सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने सांगितले आहे की काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये आयपीएल दरम्यान मलिंगाने हॉटेल रुममध्ये तिच्यावर जबरदस्ती केली होती. तसेच यात तिने असेही सांगितले आहे की तिची मैत्रीण रुममध्ये आहे, असे तिला खोटे सांगून मलिंगा रुममध्ये घेऊन गेला होता.

पण तो जबरदस्ती करत असतानाच हॉटेल स्टाफने दार वाजवल्यानंतर तिने त्याचा फायदा घेत त्या रुममधून पळ काढला असल्याचे या पोस्टमध्ये लिहीले आहे.

मलिंगाच्या आधी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगावरही असे आरोप झाले आहे. त्याच्यावर विमानात काम करणाऱ्या भारतीय कर्मचारी महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या-