IPL 2018: आयपीएल सलामीच्या सामन्याची तिकिटे संपली

या आठवड्यात ७ एप्रिल पासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. त्यातच आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.

या दोन्ही संघांचे देशभरात अनेक चाहते आहेत. तसेच आतापर्यंत आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये या दोनही संघांची गणती होते. त्यामुळे या दोन संघांमधील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

७ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या दोन संघातील सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यावरूनच यावर्षीही या दोन संघांमधील सामन्याची उत्सुकता कमी झालेली नाही हे स्पष्ट दिसून आले आहे.

तसेच वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणाऱ्या बाकी सहा सामन्यांची तिकिटे book my show या अॅपवर उपलब्ध आहेत. त्यातील मुंबईच्या सर्व सामन्यांची ८०० रुपयांची तिकिटे संपली आहेत.

वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांचे दर ८०० ते ८००० रुपयांप्रमाणे आहेत.