गेल्या ७ सामन्यात मुंबईच करतेय कोलकात्यावर राज्य!

मुंबई | आज रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने कोलकाता समोर २० षटाकांत १८२ धावांचे लक्ष ठेवले होते.

या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव २० षटकांत ६ बाद १६८ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकातकडून राॅबीन उथप्पा (५४), नितीश राणा (३१), दिनेश कार्तिक (३६) यांनी जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

READ-भारतीय संघात नाही मिळाले स्थान पण आयपीएलमध्ये घालतोय धुमाकूळ

गेल्या ७ सामन्यात मुंबईने एकदाही कोलकाताला विजय मिळवुन दिला नाही. आयपीएलमध्ये मुंबई आणि कोलकाता हे दोन संघ दिग्गज संघ मानले जातात,

त्या दोन संघातील सामनेही प्रेक्षक मोठ्या आवडीने पहातात. अशा या दोन संघातील सामन्यात मुंबईने कोलकाताला एकदाही जिंकुन दिले नाही ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.

या विजयामुळे मुंबई गुणतालिकेत ५व्या स्थानावर आली असुन कोलकाता तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

READ-आयपीएल सरासरीमध्ये कॅप्टन कुल धोनी विराट-सचिनच्या पुढे