४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात थेट नग्न अवस्थेत गेला

आज काल क्रिकेटच्या मैदानासह अन्य खेळांच्या मैदानावर सामना सुरु असताना प्रेक्षकांकडून अनेक असभ्य कृती अापण पाहतो.

गेल्या काही काळात क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरु असताना प्रेक्षकांमधून एखादी व्यक्ती नग्न होऊन मैदानात घुसून सामन्यात व्यत्यय आणल्याचे आपण पाहिले असेल.

मात्र या गोष्टीचा इतिहास 43 वर्षे जुना आहे. क्रिकेट मैदानावर सर्वात प्रथम नग्न होत खेळात व्यत्यय आणण्याचा प्रकार मायकेल अॅंग्लो नामक व्यक्तीने  4 ऑगस्ट 1975 रोजी लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्याती अॅशेस कसोटी मालिकेतील एका सामन्यात केला होता.

पेशाने मर्चंट नेव्हीमध्ये कुक असलेल्या मायकेल अॅंग्लोने 20 युरोंची पैज जिंकण्यासाठी हे कृत्य केले होते असे त्याने नंतर सांगितले होते.

त्यावेळी मायकेल अॅंग्लोला त्याच्या या कृतीसाठी 20 युरोंचा दंड झाला होता.

गेल्या काही वर्षात मैदानावर कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही अशा घटना घडत आहेत मात्र त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.