त्या फोटोमुळे मायकेल क्लार्क मोठ्या वादाच्या भोवऱ्यात

आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याची असिस्टंट साशा आर्मस्ट्राॅंगबरोबरचे त्याचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत .

शर्टलेस मायकेल क्लार्क आणि बिकीनीमध्ये असलेली साशा आर्मस्ट्राॅंग एका महागड्या याॅटवर एकत्र दिसले आहेत. यामुळे त्याची पत्नी कायली क्लार्क मात्र चिडल्याचे सांगण्यात येत आहे.

“हे फोटो पाहुन कायली नक्कीच वैतागली आहे. कोणतीही स्त्री जे करेल तेच कायलीन केले आहे.” असे एका सुत्राने विमेन्स डे या मासिकाशी बोलताना सांगितले आहे.

साशा गेली ५ वर्ष मायकेल क्लार्क सोबत काम करत असून तीच्याकडे आता क्लार्कच्या अॅकडमीचे हेड करण्यात आले आहे.

दुसऱ्या बाजूला कायली आणि क्लार्कने २०१२मध्ये विवाह केला असून त्यांना २०१५मध्ये कन्यारत्न झाले आहे.