त्या फलंदाजाच्या बाद होण्यावर उभा राहिला मोठा वाद, काय झाले नक्की?

ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग (बीबीएल) सध्या सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी पर्थ स्कॉचर्स विरुद्ध सिडनी सिक्सर यांच्यात झालेल्या सामन्यात मायकल क्लिंगरच्या बाद होण्यावर वाद निर्माण झाला आहे.

पर्थ संघाचा फलंदाज क्लिंगर हा दुसऱ्या षटकाच्या सातव्या चेंडूवर बाद झाल्याने हा वाद निर्माण झाला आहे. झाले असे की या सामन्यात सिडनी संघाने पर्थसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पर्थ संघाकडून क्लिंगर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट हे दोघे सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले.

यावेळी त्यांनी चांगली सुरुवात केली होती पण दुसऱ्या षटकात सातव्या चेंडूवर क्लिंगरने थर्डमॅनच्या दिशेने हवेत फटका मारला. पण त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्टिवन ओ किफने त्याचा झेल घेतला.

या षटकात गोलंदाजी करत असलेला बेन द्वेरश्यूजने आधीची सहा चेंडू वाइड किंवा नो बॉल असे काहीही टाकले गेले नव्हते. त्यामुळे क्लिंगर ज्या चेंडूवर बाद झाला तो षटकातील सातवा चेंडू होता.

त्यावेळी पंचांनी थर्ड अंपायरकडे तो झेल आहे की नाही हे पाहण्यासाठी रिव्ह्यू मागितला. यात तो झेल बरोबर असल्याचे दिसले. त्यामुळे क्लिंगर परत ड्रेसिंग रुममध्ये परतला. मात्र त्यावेळी तो चेंडू हा षटकातील सातवा चेंडू होता हे ना क्लिंगरच्या लक्षात आले ना पंचांच्या .

क्लिंगर बाद झाल्यानंतर रिप्लेमध्ये तो षटकाच्या सातव्या चेंडूवर बाद झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

या घटनेनंतर समालोचकांचाही गोंधळ झाला होता. त्यांना कळतचं नव्हते की मैदानावरील पंच अशी चूक कशी करु शकतात.

पण क्लिंगरची विकेट पर्थ संघासाठी जास्त महागात पडली नाही. त्यांच्याकडून बॅनक्रॉफ्टने नाबाद 87 धावा करत त्यांना 7 विकेट्सने विजय मिळवून दिला आहे. त्याच्याबरोबरच पर्थ संघाकडून अश्टन टर्नरनेही 60 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!

जेव्हा एमएस धोनी भेटतो त्याच्या ८७ वर्षीय फॅनला…

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक