जेव्हा शार्क हरवतो ऑलिंपिक विजेत्या मायकेल फेल्प्सला

तब्बल २३ ऑलिम्पिक मेडल्स जिंकणाऱ्या मायकेल फेल्प्सला ग्रेट व्हाईट शार्कने रेसमध्ये हरविले आहे. डिस्कवरी चॅनेलवर दाखवण्यात आलेल्या या स्पर्धेत १०० मीटर अंतर कापण्यासाठी फेल्प्सला शार्कपेक्षा २ सेकंद जास्त लागले.

या स्पर्धेत फेल्प्सला शर्यत पूर्ण करण्यासाठी ३८. १ सेकंद तर ग्रेट व्हाईट शार्कला ३६.१ सेकंद लागले आहेत.

या स्पर्धेवरून मोठी टीका…

दक्षिण आफ्रिकेच्या खुल्या समुद्रात झालेल्या या स्पर्धेत फेल्प्स आणि शार्क यांची पोहण्याची स्पर्धा वेगवेगळ्या वेळी घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. डिस्कवरी चॅनेलमधील तज्ज्ञांनी पहिल्यांदा शार्कचा १०० मीटरमधील वेळ मोजला आणि नंतर फेल्प्सचा.

फेल्प्सच्या स्पर्धेच्या वेळी आयोजकांनी हुबेहूब दिसणारी (अध्यारोपीत) दिसणारी ग्रेट व्हाईट शार्कची इमेज वापरली होती. ज्यामुळे ही स्पर्धा खरोखर झाल्यासारखी वाटेल.

परंतु यामुळे आयोजकांना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र मायकेलने पुन्हा एकदा ही रेस खेळण्याची तयारी दाखविली आहे