मायकल शूमाकरच्या मुलांना जिवेमारण्याची धमकी

फॉर्मुला-१ चा जग्गजेता मायकल शूमाकरचा मुलगा मिक आणि मुलगी जिना-मारिया या दोघांना अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञाताला पकडण्यात आले आहे. त्याने गेल्या वर्षी मेलच्या माध्यमातून ही धमकी दिली होती. त्यात त्याने ६ कोटी रुपये जमा करा नाही तर मरायला तयार रहा असेही म्हटले होते.

धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आले आहे. त्याने शूमाकरच्या बायकोला मेल द्वारे २०१६ साली लिहिले होते कि जर मला ३१ मार्चच्या आत रक्कम मिळाली नाही तर मुलांचे खरे नाही. मेल केल्यामुळे गुन्हेगाराला पकडणे सोपे झाले.

त्याला सध्या मानसोपचार तज्ज्ञांकडे सोपवण्यात आले आहे. २०१३ साली स्कीईंग करताना झालेल्या अपघातात शूमाकर कोमा मध्ये गेला आणि आजवर त्याच्यावर ११६ कोटी रुपये इतका खर्च झाल्याचे सांगण्यात येते. त्याच्या सध्याच्या स्थिती बाबतीत कोणती ही गोष्ट समजू शकले नाही.