गौतम गंभीरचा मिरवाईझ उमर फारूकला पाकिस्तानला जायचा सल्ला!

भारताचा स्फोटक फलंदाज आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने काश्मिरी नेता मिरवाईझ उमर फारूकला देश सोडून जायचा सल्ला दिला आहे. गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून हा हल्लबोल तेव्हा केला जेव्हा या नेत्याने पाकिस्तानच्या विजयानंतर वादग्रस्त ट्विट केले.

गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” माझं असं मत आहे की मिरवाईझ उमर फारूक तू देश सोडून का जात नाही. तुला तिकडे चांगले फटाके फोडलेले पहायला मिळतील. (चायनीज ), ईद तिकडेपण साजरी केली जाते. मी तुला तिकडे जाण्यासाठी मदत करू शकतो. ”

पाकिस्तानने सामना जिंकल्यावर मिरवाईझ उमर फारूकने ट्विट केले होते. त्यात तो म्हणाला होता की, ” सगळीकडे फटाके वाजत आहे. असं वाटतंय ईद आधीच ईद साजरी केली जातीय. चांगला संघ आज जिंकला. अभिनंदन पाकिस्तान. ”


या वादग्रस्त नेत्याने पाकिस्तानने जेव्हा इंग्लंडवर विजय मिळवला तेव्हाही ट्विट करून पाकिस्तानला शाबासकी दिली होती.