सानिया मिर्झा-शोएब मलिकचे हे संभाषण नक्की वाचा

काल लाहोर येथे पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या टी २० सामन्यासाठी भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झानेही सामन्यासाठी हजेरी लावली होती. हा सामना संपल्यानंतर या दोन पतिपत्नीमध्ये ट्विटरवर थोडी नोकझोक झाली.

या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंका संघावर ३६ धावांनी विजय मिळवत ३-० अशी मालिकाही जिंकली. तर शोएब मालिकला या सामन्याचा सामनावीर तसेच मालिकावीर किताब देण्यात आला तसेच त्याला एक दुचाकीही पुरस्कार म्हणून देण्यात आली.

त्याच वेळेस मलिकने आपला संघ सहकारी शदाब खानला बाईकवर आपल्या मागे बसवत मैदानाची एक चक्कर मारली. तेव्हा सानियाने शोएबचा बाइकबरोबरचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट करून लिहिलं “जाऊयात का यावर?” या तिच्या ट्विटवर शोएबने उत्तर दिले की “हो हो, लवकर ये मी वाटेतच आहे”

पण काही क्षणातच तिने पुन्हा एकदा ट्विट केलं की “ठीक आहे. हरकत नाही. मला वाटत तुझ्या मागची जागा आधीच घेतली आहे.” आणि यावेळेस तिने शोएबचा आणि शदाबचा बाईकवरचा फोटो पोस्ट केला. त्यावर शोएब तिला म्हणाला.”नाही नाही त्याला मी मैदानावरच सोडून आलो. असं काही नाहीये”

त्यांच्या या गमतीशीर ट्विटनंतरसुद्धा खानने सोनियाची माफी मागणारे एक ट्विट केली ज्यात त्याने तिला उप्स सॉरी भाभी असे म्हणाला.

काल श्रीलंका संघ २००९ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला गेला होता. २००९ मध्ये श्रीलंका संघावर दहशदवादी हल्ला झाला होता.