पाकिस्तानी कर्णधारचा एक असाही विश्वविक्रम

क्रिकेटमध्ये विक्रम हे तोडण्यासाठीच बनतात .पण काही खास विक्रम आहेत जे कोणताही खेळाडू तोडण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. पाकिस्तानचा ४२ वर्षीय कर्णधार मिस्बाह-उल-हकनेही क्रिकेटविश्वात एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय .

 

एखादा क्रिकेटर ९९ धावांवर बाद झाला तर किती निराश आणि दुःखी होतो हे आपण सगळ्यांनी पहिलच आहे. पण मिस्बाह मात्र त्याला अपवाद आहे . मिस्बाह ९९ धावांवर २ वेळा बाद आणि एकवेळ नाबाद राहिला आहे . ३ वेळा ९९ धावांवर आपली खेळी संपवणारा मिस्बाह जगातील एकमेव क्रिकेटर आहे .सध्या पाकिस्तान संघ वेस्ट इंडिजचाच्या दौऱ्यावर आहे.

मिस्बाह पहिल्या कसोटीत ९९ धावांवर असताना नाबाद राहिला आणि दुसऱ्या कसोटीतसुद्धा ९९ धावांवर असताना बाद झाला. या अगोदर २०११ साली न्यूज़ीलैंड बरोबर खेळताना मिस्बाह पहिल्यांदा ९९ धावांवर बाद झाला होता.

 
१४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम प्रथमच बनला आहे. यापूर्वी भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यांत ३वेळा ९९ धावांवर बाद झाला आहे.