टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली आहे.

आता पुढील सामना पर्थ येथे होणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आत्तापर्यंत राहिले आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनने वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

स्टार्कने अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 अशा 5 विकेट्स घेतल्या होत्या.

स्टार्कबद्दल बोलताना त्याचा पुर्वीचा संघासहकारी जॉन्सन म्हणाला की स्टार्कच्या मनात कसलातरी गोंधळ सुरु आहे.

याबद्दल जॉन्सन बीबीसीशी बोलताना म्हणाला, ‘प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी असते. मी त्याला काही संदेश पाठवले आहेत, जर त्याला काही मदत हवी असेल किंवा काही बोलायचे असेल तर. कारण मी याआधी त्याच्याबरोबर खेळलो आहे. त्यामुळे त्याला मी ओळखतो.’

‘असे वाटत आहे की त्याच्या मनात काहीतरी सुरु आहे. ज्यामुळे त्याला फायदा होत नाहीये. त्यामुळे आशा आहे की पर्थ कसोटी आधी आम्ही एकमेकांशी चर्चा करु.’

तसेच पर्थमध्ये स्टार्क चांगला आणि आक्रमक खेळेल असा विश्वास व्यक्त करताना जॉन्सन म्हणाला, ‘खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टार्क चांगली कामगिरी करेल. मी त्याला इतकच सांगेल, त्याने स्वत:वर विश्वास ठेवावा आणि खेळात झोकून द्यावे.’

स्टार्कने म्हटले होते की त्याच्या जून्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याच्या  तळपायाची काळजी वाटत आहे. मागील 8 सामन्यात स्टार्कला फक्त 29 विकेट्स घेण्यात यश आले आहे.

जॉन्सन पुढे म्हणाला, ‘मला माहित आहे स्टार्कमध्ये क्षमता आहे. पण तो सध्या योग्यवेळी चेंडू स्विंग करत नाही. कदाचीत तो पूर्ण तयार नसावा. तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता आणि त्याने आत्ता पुनरागमन केले आहे. पण तो त्याच्या लयीत नाही.

‘मला माहित असलेला स्टार्क हा चांगला धावतो आणि त्याचे रनअपही चांगले आहे. तसेच तो फलंदाज काय करणार आहे हे चांगले जाणतो. तो खेळात पूर्णपणे सहभागी असतो. पण आत्ता तो तसा दिसत नाही.’

महत्त्वाच्या बातम्या:

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप

१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम

भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी