४० वर्षातील सर्वात मोठा पराक्रम, एकाच सामन्यात २ हॅट्रिक

सिडनी । ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एकाच सामन्यात दोन हॅट्रिक घेतल्या आहेत. न्यू साऊथ वेल्स विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.

१९७९ नंतर प्रथमच क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात अशी कामगिरी झाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यापूर्वी केवळ ८ खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे. परंतु स्टार्कची ही हॅट्रिक दोन वेगवेगळ्या डावात असून ८ पैकी केवळ २ खेळाडूंनी एकाच डावात दोन हॅट्रिक घेतल्या आहेत.

मिचेल स्टार्क हा ऍशेस मालिकेसाठी सध्या तयारी करत असून तो सध्या दुखापतीमधून बरा झाला आहे. त्याने ही हॅट्रिक न्यू साऊथ वेल्स संघाकडून घेतली आहे.

ही कामगिरी करताना त्याने पहिल्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेंडॉफ. डेविड मूडी आणि सिमोन मॅकिन यांना बाद केले. पहिल्या डावात त्याने २० षटके गोलंदाजी करताना ५६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात त्याने चौथ्या दिवशी त्याने पहिल्या हॅट्रिकमधील जेसन बेहरेंडॉफ. डेविड मूडी यांना परत बाद केले तर जोनाथन वेल्स या खेळाडूला बाद करत आपली हॅट्रिक साजरी केली. दुसऱ्या डावात त्याने १५.१ षटके गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या.

एकाच सामन्यात दोन हॅट्रिक घेतलेले खेळाडू
ए. शॉ 1884
ए ट्रॉट 1907
टी. मॅथेव्स 1912 (कसोटी)
सी. पार्कर 1924
आर. जेनकिन्स 1949
अमीन लखानी 1978
मिचेल स्टार्क 2017