महिलांच्या आयपीएलसाठी देशांतर्गत क्रिकेट मजबूत असणे महत्वाचे – मिथाली राज

पुढील महिन्यात आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. पण हे आयपीएल सुरु होऊन ११ वर्ष झाले तरीही अजून महिलांच्या आयपीएलबाबत कोणतेही निर्णय झालेले नाही. महिलांच्या आयपीएल बाबत मिथाली राजने आज आपली मते मांडली आहेत.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिथाली राजने आज म्हटले, ” महिलांसाठी आयपीयलसारखे सामने हे तेव्हाच योग्य असतील जेव्हा बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी अधिक वाव देईल. आयपीएलसारख्या लीगमध्ये पात्र होण्यासाठी खेळाडूही असणे महत्वाचे आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे भारत ए संघातही गुणवत्तापूर्ण खेळाडूंची गरज आहे. जेव्हा असे खेळाडू मिळतील तेव्हा आयपीएलसारखी स्पर्धा घेणे योग्य ठरेल. “

 जेव्हा तुमच्याकडे देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू असेल तर त्या खेळाडूला आयपीयलमध्ये संधी द्यावी.”

भारताला सध्या अशा उत्तम खेळाडूंची आवश्यकता आहे. जेव्हा असे खेळाडू मिळतील तर ते  आयपीयलला पुरेसे असेल.

भारतीय क्रिकेट मंडळ आयपीएलच्या 11व्या हंगामात महिलांसाठी प्रदर्शित सामने आयोजित करणार आहे. यामध्ये सर्वांचे हरमनप्रीत कोैर, झुलन गोस्वामी व  मिथाली राज अशा खेळाडूंकडे लक्ष असेल.

पुढे मिथाली म्हणाली, “आयपीएलसारख्या लीगमध्ये तुम्ही कोणत्याही देशांतर्गत खेळाडूला खेळवू शकता पण त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि देशांतर्गत खेळाडू यांच्यातील फरक स्पष्ट दिसून येईल. यामूळे कदाचित हे महिला क्रिकेटच्या प्रसाराविरुद्ध जाऊ शकते.”

या मिथालीच्या विचारांवर अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने सुध्दा सहमती दर्शवली.” देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव असणे हे खूपच चांगले आहे “, असे झुलन म्हटली.

उद्यापासून भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघांदरम्यान तिरंगी टी-20 मालिका मुंबई मध्ये सुरू होत आहे. याआधी नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या तिरंगी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.