महिला विश्वचषक: मिताली राजच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा

भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत ६००० धावा केल्या आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली आणि एकमेव खेळाडू आहे.

महिला क्रिकेटच्या तीनही प्रकारात कोणत्याही खेळाडूने आजपर्यत ६००० धावांचा टप्पा पार केलेला नव्हता. महिला क्रिकेटमधील दिग्गज संघ असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना तिने हा पराक्रम केला.

आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ह्या मिताली राज (६०१४), कसोटीमध्ये इंग्लंडच्या जेनेट ब्रिटीन (१९३५) तर टी२०मध्ये इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्स (२६०५) धावा आहेत.

मिताली राजच्या नावावर आता एकदिवसीय सामन्यात ६०१४ धावा, कसोटीमध्ये ६६३ तर टी२० प्रकारात १०७८ धावा आहेत.