फिफा विश्वचषक 2018:  मोहम्मद सालाहची इजिप्त संघात एंट्री

स्टार फुटबाॅलपटू आणि लिव्हरपूल संघाचा स्ट्रायकर मोहम्मद सालाहचा 2018 फुटबाॅल विश्वचषकासाठी इजिप्त संघात समावेश करण्यात आला आहे.

यूईएफए चॅम्पीयन्स लीगच्या अंतिम सामन्यात खेळताना सालाहच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा विश्वचषक संघातील सहभाग अनिश्चीत होता.

इजिप्त संघ 1934 आणि 1990 नंतर 2018 च्या फुटबाॅल विश्वचषकासाठी तिसऱ्यांदा पात्र झाला आहे.

इजिप्तचा सलामीचा सामना 15 जूनला ऊराग्वे विरूध्द होणार आहे. या सामन्यासाठी सालाह ऊपलब्ध नसणार आहे.

तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकाच सहभागी होण्याची संधी मिळालेल्या इजिप्तची पूर्ण मदार सालाहवर असणार आहे.

त्याने नुकत्याच पार पडलेल्या यूईएफए चॅम्पीयन्स लीग आणि इंग्लीश प्रीमियर लीग स्पर्घेत लीव्हरपूलकडून खेळताना 44 गोल नोंदविले आहेत.