अॅलिसन बेकरचे गोलकिपींगचे कौशल्य पाहुन सलाह झाला अाश्चर्यचकित

लीव्हरपूल आणि इजिप्तचा मोहम्मद सलाह याने गोलकिपर अॅलिसन बेकर याने रोखलेल्या गोलचे कौतुक केले आहे.

सध्या लीव्हरपूलचा संघ फ्रान्समध्ये 28 जणांसोबत ट्रेनिंग कॅम्पमध्ये व्यस्त आहे.जेव्हा बेकरने सरावात संघातील सहकाऱ्याचा गोल रोखला तेव्हा सलाह हा नेटपाशी उभा होता.

यावेळी त्याने बेकरचे कौशल्य बघून खूप खूष झाला.सलाहची ही प्रतिक्रिया लीव्हरपूलने सोशल मिडियावर शेयर केली आहे.

त्याच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी पण आपापली मते ट्विटरवर व्यक्त केली.

त्यातील, ‘एकाने बघा सलाह हा किती खूष आहे कारण शेवटी त्याच्या संघाला बॉलला रोखणारा गोलकिपर मिळाला आहे.’

‘सलाहचा तो आनंदी चेहरा सांगत आहे की शेवटी त्यांना एक चांगला गोलकिपर मिळाला.’

त्याच्या काही वेळानंतरच लीव्हरपूलने सलाहने केलेल्या गोलचा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला.

तसेच सलाह त्याचा चाहता निर्वासित अम्मर याच्या परिवाराला भेटला. अम्मर हा मुळचा सिरियातील असून दोनच वर्षापुर्वी ते अमेरिकेत स्थायिक झाले. यावेळी सलाहने या परिवाराला त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी दिली आणि त्याच्यासोबत फोटोही काढले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

व्हिडिओ: मेस्सीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं

प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड