४७ कसोटीत भारताचा कॅप्टन असणाऱ्या खेळाडूचा मुलगा करतोय रणजी पदार्पण

पणजी | भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा या रणजी हंगामात गोवा संघाकडून खेळताना दिसणार आहे. २८ वर्षीय असदुद्दीन हा यावेळी संघात स्थान देण्यात आले असुन यावरुन मोठी टीका होत आहे.

कोणतेही मानधन न घेता भारताचे माजी कर्णधार असलेले मोहम्मद अझरुद्दीन यावेळी गोव्याला मार्गदर्शन करणार आहे. याबद्दल गोवा क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

याबद्दल शाहबाद जकातीने या गोव्याच्या अनुभवी खेळाडूने जोरदार टीका केली आहे. “एकही सामना न खेळलेल्या असदुद्दीनला सरळ गोवा रणजी संघात कशी संंधी देण्यात आली. यामुळे गोव्याचे क्रिकेट मागे जाणार आहे. ” असे भाष्य जकातीने केले आहे.

जीसीएच्या सचिवांनी या निवडीची माहिती देताना म्हटले होते की, असदुद्दीन अझरुद्दीन यांचे पुत्र आहे. तसेच ते यावेळी गोव्याला कोणतीही फी न घेता मार्गदर्शन करणार आहे. त्यांचे मार्गदर्शन संघासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच पुढे याबद्दल माहिती देताना सचिव म्हणाले, असदुद्दीन हे संघाबरोबर एक पाहुणा खेळाडू म्हणुन जोडले गेले आहेत. त्याला संघटनेने एक पैसाही दिला नाही. आमच्याकडे पैसेच नाही त्यामुळे आम्ही हा मार्ग निवडला आहे.

जकातीने यापुर्वीही यावर टीका केली आहे. “केवळ भारतीय संघाचे माजी कर्णधार अझरचे पुत्र असल्यामुळे असदुद्दीनला संघात स्थान देणे कितपत योग्य आहे. २८ वर्षीय असदुद्दीनने एकही रणजी सामना खेळला नाही. आमंत्रितांसाठीच्या स्पर्धेत त्यांनी शेवटचा सामना २००९मध्ये उत्तरप्रदेशसाठी खेळला आहे. याच संघाकडून त्यांनी खेळण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु संधी मिळाली नाही. ” असेही हा गोव्याचा अनुभवी खेळाडू पुढे म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश

एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक