तब्बल १२०० ओव्हर्स गोलंदाजी केलेल्या त्या खेळाडूने एकही नो-बॉल टाकला नाही

पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने वनडेत १२०० षटकांत एकही नो-बॉल टाकला नाही. काल श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने कारकिर्दीत हा पराक्रम केला.

वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडून नो-बॉल टाकले जाणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. असे असताना ३७ वर्षीय हाफिजने उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करताना वनडेत कधीही नो-बॉल टाकला नाही.

एप्रिल २००३ मध्ये हाफिजने झिम्बाब्वेविरुद्ध वनडे कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. आजपर्यंत १९२ वनडेत १६० डावात गोलंदाजी करताना ह्या खेळाडूने तब्बल ७२०२ चेंडू टाकले आहेत. त्यात ४९५० धावा देताना एकही नो-बॉल टाकला नाही हे विशेष.

१६० डावात १३५ विकेट्स घेणारा हाफीज हा मुख्यकरून समोरच्या संघाला सहजासहजी धावा जमा करू न देणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो.

हाफीजने याबरोबर १९२ वनडेत ३३च्या सरासरीने ५९१६ धावा देखील केल्या आहेत.