भारत एक सहिष्णू आणि सर्वसमावेशक देश आहे. मोहम्मद कैफचा पाकिस्तानी ट्विपलला समज

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काल स्थगिती दिली. त्यानंतर असंख्य भारतीयांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. त्यात भारताचा माजी फलंदाजही मोहम्मद कैफचा मागे नव्हता. या निर्णयाचं स्वागत करताना कैफने ट्विटच्या माध्यमातून सर्व भारतीयांचं अभिनंदन केलं. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचही आभार मानलं.

यावर एका पाकिस्तानी ट्विपलने कैफला स्वतःच्या नावातून मोहम्मद नाव काढण्याचा सल्ला दिला.

त्यावर कैफने २ ट्विट करून या पाकिस्तानी ट्विपलचा जोरदार समाचार घेतला. कैफ त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, ” जर मी भारताला पाठिंबा दिला म्हणून मी माझ्या नावातून मोहम्मद का काढायचं. मला माझ्या नावाचा अभिमान आहे. ”

” कुणीही धर्माचा ठेकेदार नाही. कुणाकडेही कोणत्याही नावाचे कॉपीराईट्स नाहीत. भारत हा एक सहिष्णू आणि सर्वसमावेशक देश आहे.” असे कैफ आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

सध्या मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग हे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी ट्विपलकडून ट्विटरवर टार्गेट केले जात आहे.